बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आपल्या करियर आणि आयुष्याबद्दल कोण-कोणती स्वप्ने पाहिली नसतील, परंतु आत्महत्या केल्याने ही सर्व स्वप्ने चिरडली गेली आणि तोही सर्वापासून दूर गेला. अद्यापही त्याच्या आत्महत्येमागील कारणं स्पष्ट झालेलं नाही.
#Candle4SSR pic.twitter.com/GLhmo1VStw
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 22, 2020
यातच वकील इशकरण सिंह भंडारी यांनी सुशांतच्या चाहत्यांना मेणबत्ती लावून सुशांतला श्रध्दांजली वाहण्याचं आवाहन केलं होतं.
कंगनाने सुशांतसाठी दिवा लावला असून याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करत तिने #CandleForSSR असा हॅशटॅगही दिला आहे. कंगनाप्रमाणेच अभिनेत्री अंकितानेदेखील सुशांतसाठी दिवा लावत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.