नवी दिल्ली – शरद पवार गट अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) विरोधात आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करावे या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदिप धनखड (Vice President) यांची भेट घेतली आहे. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar Group) गटाच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे, शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश असल्याची माहिती आहे.(Cancel Praful Patel’s Rajya Sabha membership)
4 महिन्यांपूर्वी दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्यासाठी मागणी करून देखील कारवाई न झाल्याने शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांना पत्राच्या माध्यमातून आठवण देखील करून देण्यात आली होती.
वंदना चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने ही भेट घेतल्याची माहिती आहे. चार महिन्यांपूर्वी आम्ही पत्र दिलेले आहे, त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, याबाबतही धनखड यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. (Praful Patel)