Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा – गोंदिया , चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली चिमूर या एकूण ५ जागांसाठी ९५ उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
विदर्भातील या ५ लोकसभा मतदारसंघापैकी भंडारा गोंदिया मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. येथे भाजप पक्षाकडून सुनिल मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेस कडून डॉ प्रशांत पडोळे यांना तिकीट देण्यात आले आहे.
अशात भंडारा गोंदिया मतदार संघात भाजपला अजित पवार गटातील नेते प्रफ्फुल पटेल यांचा फायदा निवडणूक जिंकण्यात होऊ शकतो अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
भंडारा – गोंदिया मतदार संघात अजित पवार गटातील नेते प्रफ्फुल पटेल यांचे वर्चस्व
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचा फायदा मेंढे यांना होऊ शकतो. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे या मतदार संघात भाजप नेते सुनील मेंढे यांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांची साठी मिळणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे यांनी तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता.
सुनील मेंढे यांच्या बाबत सांगायचे झाल्यास…
सुनील मेंढे हे पाच वर्ष खासदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे यांनी तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मेंढे हे महायुतीचे उमेदवार असल्यानं त्यांच्यामागे प्रफुल्ल पटेल यांचीही ताकद आहे. मोदींचा चेहरा आणि राम मंदिर हे दोन मुद्दे मेंढे मतदारांसमोर घेऊन जाताना दिसतात. सुनील मेंढे यांच्या तुलनेत पडोळे हे अतिशय नवीन उमेदवार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मेंढे हे संघाशी जुळलेले असल्याने संघाचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहे. मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत आहे.
हे वाचले का ? ‘दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार’, आप मंत्री आतिशी यांचा मोठा दावा