“कॅनडा वर्क परमिट’च्या आमिषाने आठ लाखांचा गंडा

पिंपरी – कॅनडातील वर्क परमिट देऊन तेथे तुम्हाला कायमचे रहिवासी बनवून देतो, असे सांगून एका महिलेला तब्बल आठ लाख रुपयांचा गंडा घातला. ही घटना जानेवारी 2019 पासून ते रविवार (दि.5 मे) दरम्यान सेक्‍टर नं.7, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. साधना हरिसराय सिंग (वय 32, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, जतिन नरेंद्रसिंग ठाकूर (वय 34, रा. नरेगाव, पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोप जतिन याने फिर्यादी साधना यांना कॅनडातील वर्क परमिट आणि तेथील कायमचे रहिवासी पत्र काढून देतो, असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादित केला. या बदल्यात साधना यांना आठ लाख रुपये खात्यात पाठविण्यास करण्यास सांगितले. त्यानुसार साधना यांनी जितेन याच्या सांगण्यावरुन मानव गायधने व इतरांच्या खात्यावर आठ लाख रुपये पाठविले. पैसे दिल्यानंतरही जतिन याने साधनाला कॅनडातील वर्क परमिट व तेथील कायमचे रहिवासी पत्र ही दिले नाही. त्यामुळे, साधना यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जतिन याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जतिन याला अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.