Canada Plane Crash : एकीकडे अंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि कॅनडामधील (Canada) वाद चिघळत असताना आता पुन्हा एकदा कॅनडामधून एक बातमी समोर येत आहे.
कॅनडातील (Canada) व्हँकुव्हरजवळील चिलीवॅक याठिकाणी एक छोटे विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या विमान अपघातात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
कॅनडामधील (Canada) स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान परिसरातील एका झाडावर आदळल्यानंतर अपघात झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन भारतीय वैमानिकांची नावे अभय गद्रू आणि यश विजय रामुगडे असून ते मुंबईचे रहिवासी होते. स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून दुर्घटनेचा पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कॅनडाच्या (Canada) पोलिसांनी याविषयी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात पोलिसांनी,’घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे आणि या परिसरातील लोकांना या अपघातामुळे धोका असल्याची कोणतीही माहिती नाही. पाईपर पीए-३४ सेनेका नावाच्या छोट्या ट्विन-इंजिन विमानात हा अपघात झाला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.