Bollywood news – बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने अनेक हिट चित्रपट आपल्या नावावर केले आहे. आज जरी ती चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांमध्ये नेहमीच लोकप्रिय असते. विद्या दररोज प्रत्येक ट्रेंडिंग व्हिडिओवर रील बनवत असते आणि ते इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
View this post on Instagram
दरम्यान, विद्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये विद्या विमानतळावर दिसली आहे. यावेळी विद्यासोबत एक लहान मुलगी दिसते आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. विद्याचे या मुलीसोबतचे बॉन्ड पाहून यूजर्स तिला अभिनेत्रीची मुलगी म्हणत आहेत.
अलीकडेच विद्या बालनला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी तिच्यासोबत एक लहान मुलगी दिसते. विद्याने या मुलीसोबत गाडीतून खाली उतरून तिला मिठी मारली आणि भरपूर पोझ दिल्या. यादरम्यान विद्याचे ज्या प्रकारे मुलीसोबत बॉण्ड होते, ते पाहून युजर्स हैराण झाले आहे. हा व्हिडिओ पाहून काही युजर्सनी ही विद्या बालनची मुलगी असल्याचं म्हटलं आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये विद्या मुलीवर खूप प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की,’ही मुलगी कधी आली?’ असं म्हणत आता ही विद्याची लेक आहे का असा प्रश्न सोशलवर चाहत्यांकडून विचारला जात आहे.
विद्या बालनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अक्षय कुमारसोबत ‘मिशन मंगल’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर विद्या ‘नियात’ चित्रपटात दिसली. सध्या ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे.