Rajasthan Cabinet Expansion: राजस्थानमध्ये शनिवारी भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या मंत्र्यांना शपथ दिली. राजधानी जयपूरमधील राजभवनात शनिवारी संध्याकाळी 3.15 वाजता शपथविधीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सर्वप्रथम पक्षाचे ज्येष्ठ नेते किरोरी लाल मीना यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले होते. सर्व मंत्र्यांबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती..
1. किरोरी लाल मीना: किरोरी लाल मीना हे भाजपचे राज्यसभा खासदार होते. पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीत उभे केले होते. निवडणूक जिंकल्यानंतर किरोरीलाल मीणा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर आता किरोरीलाल मीना यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
2. गजेंद्र सिंह खिंवसर- किरोरी लाल मीना यांच्यानंतर गजेंद्र सिंह खिंवसर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. गजेंद्र सिंह खिंवसार लोहावत मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
3. राज्यवर्धन सिंह राठोड: राज्यवर्धन सिंह वय 53, पदवीधर (झोटवाडा): पहिल्यांदाच आमदार झाले आहेत, यापूर्वी केंद्रात मंत्री राहिले आहेत. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी आज राजस्थानचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आज शपथ घेणारे ते तिसरे नेते आहेत.
4. बाबूलाल खराडी- झाडोलचे आमदार बाबूलाल खराडी यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
5. मदन दिलावर: कोटाच्या रामगंज मंडी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झालेले मदन दिलावर आज मंत्री झाले आहेत. शनिवारी दुपारी राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली.
6. जोगाराम पटेल: लुनी विधानसभेतून विजयी झालेले जोगाराम पटेल मंत्री झाले आहेत. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी आज त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
7. सुरेश सिंह रावत: पुष्कर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सुरेश सिंह रावत भजनलाल सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. आज राजभवन येथे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली.
8. अविनाश गेहलोत: जैतरण विधानसभा मतदारसंघातून भाजपला विजय मिळवून देणारे आमदार अविनाश गेहलोत भजनलाल सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. आज राजभवनात राज्यपालांनी त्यांना शपथ दिली.
9. जोराराम कुमावत: सुमेरपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या झोराराम कुमावत यांना राजस्थान सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी आज त्यांना राजभवनात मंत्रीपदाची शपथ दिली.
10.हेमंत मीणा: प्रतापगड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार हेमंत मीणा यांना भजनलाल सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी आज त्यांना राजभवनात शपथ दिली.
11. कन्हैया लाल चौधरी: टोंक जिल्ह्यातील मालपुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपला विजय मिळवून देणारे कन्हैया लाल चौधरी यांना भजनलाल सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळातही स्थान मिळाले आहे. आज राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना राजभवनात शपथ दिली.
12.सुमित गोदारा: राजस्थान विधानसभा निवडणुकीत लुंकरानसार मतदारसंघातून भाजपला विजय मिळवून देणारे सुमित गोदारा यांना भजनलाल सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. आज राज्यपालांनी त्यांना राजभवन येथे मंत्रीपदाची शपथ दिली.
या सर्व 12 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर अनेक आमदारांनी स्वतंत्र प्रभार घेऊन तर अनेकांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 13. संजय शर्मा, 14. गौतम कुमार, 15. जबर सिंग खरा, 16. सुरेंद्र पाल सिंग टीटी,17. हिरालाल नागर, 18. ओतराम देवासी..
याशिवाय या लोकांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
19. मंजू बागमार : राजस्थानच्या जयल सीटवर विजयी झालेल्या मंजू बागमार यांना भजनलाल सरकारमध्ये राज्यमंत्री करण्यात आले आहे. आज त्यांनी राज्यपाल मिश्रा यांच्या उपस्थितीत राजभवनात शपथ घेतली. 51 वर्षीय मंजू बागमार यांनी पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते जयलचे आमदार आहेत. त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत.
20. विजय सिंह चौधरी: विजय सिंह चौधरी यांना भजनलाल सरकारमध्ये राज्यमंत्री करण्यात आले आहे. राज्यपाल मिश्रा यांनी आज त्यांना शपथ दिली.
21. केके बिश्नोई: काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गुडामलानी जागेवर भाजपला विजय मिळवून देणारे केके बिश्नोई यांना भजनलाल सरकारमध्ये राज्यमंत्री करण्यात आले आहे. आज राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना राजभवनात शपथ दिली.
22. जवाहर सिंग बेधम: जवाहर सिंग बेधम 55 वर्षांचे आहेत. त्यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले आहे. नगर मतदारसंघातून आमदार झाले. भरतपूरमधील पक्षाचा मुख्य गुर्जर चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.