नवी दिल्ली – दिल्लीच्या एकूण बसेस पैकी 80 टक्के बसेस 2025 पर्यंत इलेक्ट्रिकवर धावतील, अशी माहिती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले की सरकार 2023 मध्ये अशा 1,500 बस खरेदी करणार आहे आणि 2025 पर्यंत 6,380 इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या जातील. आमच्याकडे सध्या 300 इलेक्ट्रिक बसेस आहेत. दिल्लीत सध्या एकूण 7,379 बसेस रस्त्यावर धावत आहेत.
केजरीवाल म्हणाले की, आम्हाला नवीन बसेस खरेदी करण्यातही अडथळे आणले गेले त्यामुळे गेल्या काहीं दिवसांमध्ये नव्या इलेक्ट्रीक बसेस खरेदी करता आल्या नाहीत. दिल्लीत कार्यरत असलेल्या एकूण 7,379 बसेसपैकी 4,000 हून अधिक बसेस दिल्ली परिवहन महामंडळाच्या आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे जवळपास 100 इलेक्ट्रिक फीडर बसेस चालवल्या जात असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
Maharashtra : राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर; आंदोलन मागे घेण्याचे सरकारकडून आवाहन
2025 पर्यंत, दिल्लीच्या रस्त्यावर 10,000 पेक्षा जास्त बसेस असतील आणि त्यातील 80 टक्के इलेक्ट्रिक असतील. प्रदूषण कमी करण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे,असे ते म्हणाले.