पुणे : लखनौमध्ये झालेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणा-या सौरभ वर्माने मंगळवारी जाहीर झालेल्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सात स्थानाची झेप घेतली आहे. त्यामुळे सौरभ क्रमवारीत टाॅप-३० मध्ये सामिल झाला आहे.
JUST IN: @sourabhverma09 is WR 29💪👏
RunnersUp at #syedmodiinternational2019 & posing an exceptional form in 2019,India's #SourabhVerma achieves career-best ranking as he scales the Top30 of the #BWF world ranking.Many Congratulations!
Keep Rising! #IndiaontheRise #badminton pic.twitter.com/TnbycIpdoL— BAI Media (@BAI_Media) December 3, 2019
सौरभ वर्माला सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीन तैपईच्या वँग त्झू वेईने १५-२१, १७-२१ असे पराभूत केलं होतं, मात्र अंतिम फेरीत पोहचण्याचा सौरभला फायदा झाला. त्यामुळे त्याची जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सुधारणा झाली असून तो ३६ व्या स्थानावरून २९ व्या स्थानी पोहचला आहे.