OnePlus या चायनीज स्मार्टफोन कंपनीने काल आपला नवा फोन oneplus nord (नॉर्ड) भारतीय बाजारपेठेत सादर केला. oneplus द्वारे ‘वनप्लस-वन’नंतर मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेला हा पहिलाच फोन आहे. भारतामध्ये oneplus च्या इतर स्मार्टफोन्सना ग्राहकांचा अफाट प्रतिसाद मिळाला असून या फोनला देखील भारतीय ग्राहक चांगला प्रतिसाद देतील अशी oneplus ची अपेक्षा आहे. जर तुम्ही देखील oneplus nord (नॉर्ड) खरेदी करण्याच्या बेतात असाल तर हे ८ मुद्दे एकदा नक्की वाचा…
- भारतामध्ये oneplus nord (नॉर्ड) या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ पासून ते २९,९९९ इतकी ठेवण्यात आली आहे. २४,९९९ रुपयांना ६जीबी/६४ जीबी मॉडेल, २७,९९९ रुपयांना ८ जीबी/१२८ जीबी मॉडेल तर २९,९९९ रुपयांना १२ जीबी/२५६ जीबी मॉडेल विकत घेता येणार आहे.
- ६ जीबी रॅम असलेले मॉडेल हे केवळ भारतामध्ये लाँच करण्यात आलं असून ते सप्टेंबरपासून विक्रीस उपलब्ध असणार आहे. तर ८ व १२ जीबी मॉडेल्सची विक्री ४ ऑगस्टपासून सुरु होईल.
- oneplus nord (नॉर्ड) हा फोन दोन रांगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून हा फोन घेताना तुमच्यासमोर ब्लु-मार्बल व ग्रे-ओंक्सि हे दोन कलर ऑप्शन्स असणार आहेत. जर तुम्ही ६ जीबी ६४ जीबी व्हेरियंट घ्यायच्या विचारात असाल तर ते केवळ ग्रे-ओंक्सि या एकाच रंगात उपलब्ध असेल. oneplus nord (नॉर्ड) चीखरेदी Amazon.in, OnePlus.in, व वनप्लस रिटेल स्टोअरमधुन करता येईल.
- सध्या या फोनची प्री-बुकिंग वनप्लसच्या अधिकृत स्टोअर्समध्ये सुरु असून येत्या २८ तारखेपासून तुम्ही हा फोन Amazon.in वर देखील प्री-बुक करू शकणार आहात. नेहमी प्रमाणे रेड क्लब केबलच्या सभासदांना विशेष सूट मिळणार आहे.
- वनप्लस नॉर्ड फोनची खरेदी प्री-ऑर्डरद्वारे करणार आहेत त्यांना देखील Amazon.in वर नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन मिळणार आहे. याखेरीज अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्ड वापरल्यास २,००० रुपयांचा डिस्काउंट तर रिलायन्स जिओतर्फे ६,००० रुपयांपर्यंतचे फायदे भेटतील.
- वनप्लस नॉर्डमध्ये तुम्हाला ६.४४ इंचांचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर, ५जी कनेक्टिव्हीटी असे आघाडीचे फीचर्स देण्यात आलेत. सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूस कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
- फोनमध्ये ४,११५ एमएएचची बॅटरी देण्यात आली असून फास्ट चार्जिंगचे फिचर देखील देण्यात आलं आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हा फोन ० ते ७०% चार्ज होण्यासाठी केवळ ३० मिनिटांचा अवधी घेतो.
- वनप्लस नॉर्ड हा देखील कंपनीच्या ऑक्सिजन ओएसवर काम करणार आहे. यामध्ये वनप्लस ८ प्रमाणेच क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आलाय.