OnePlus : हँडसेट निर्माता वनप्लस ओपनचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच ग्राहकांसाठी बाजारात दाखल होणार आहे. या आगामी स्मार्टफोनबाबत आतापर्यंत अनेक अहवाल समोर आले. आणि कंपनी OnePlus Open मोबाईल पुढील आठवड्यात लॉन्च होणार आहे.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करताना लॉन्च झाल्यानंतर वनप्लसचा हा फोन सॅमसंग, मोटोरोला आणि टेक्नो सारख्या कंपन्यांच्या फोल्डेबल फोनला थेट टक्कर देईल. लीक झालेल्या रिपोर्टचा विचार केला तर वनप्लसचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन वनप्लस ओपन भारतात जवळपास १.२० लाख रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. असे झाल्यास, टिपस्टर योगेश ब्रार यांच्या मते, वनप्लस ओपनची किंमत Samsung Galaxy Z Fold 5 पेक्षा सुमारे ४४ हजार रुपये कमी असेल. Galaxy Z Fold 5 ची सुरुवातीची किंमत ही १,६४,९९९ रुपये आहे.
You’re invited to open the next chapter of OnePlus #OnePlusOpen #OpenForEverything
— OnePlus India (@OnePlus_IN) October 12, 2023
OnePlus ने सांगितले की,’हा आगामी OnePlus स्मार्टफोन पुढील आठवड्यात 19 ऑक्टोबर रोजी मुंबईत संध्याकाळी 7:30 वाजता लॉन्च होईल. कंपनीच्या या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या आतापर्यंत समोर आलेल्या तपशिलांवरून असे समोर आले आहे की फोनचा अंतर्गत डिस्प्ले 7.82 इंच OLED स्क्रीन असेल जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो.’
लीक स्पेसिफिकेशन्सवरून असेही सूचित होते की फोनच्या बाहेरील बाजूस 6.31-इंच OLED स्क्रीन दिली जाईल आणि तुम्हाला ही स्क्रीन 120 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मिळेल.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तीन कॅमेरे दिले जाऊ शकतात, 48 मेगापिक्सेल प्राइमरी वाइड-एंगल लेन्स, 48 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेन्सर.
काही वेळापूर्वी समोर आलेल्या रिपोर्टवरून असे समोर आले आहे की फोन गीकबेंच सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट झाला आहे.सर्टिफिकेशन साइटवर दिलेल्या लिस्टनुसार, OnePlus Folding Phone मध्ये Snapdragon 8 Generation 2 चिपसेट असून स्पीडसाठी 12 GB रॅम आहे आणि मल्टीटास्किंग. आहे. Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 4805 mAh बॅटरी आहे जी 100 वॉट वायर्ड फास्ट चार्जला सपोर्ट करते.