नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांना करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अनंत अंबानी यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनंत अंबानी यांची शुक्रवारी प्रकृती खालावल्याने ते एचएन रिलायन्स रुग्णालयात गेले होते. त्याला चौकशी करण्यास सांगण्यात आले आणि त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्याला दाखल करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. याशिवाय बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोन यांनीही अंबानींच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले होते.
गेल्या आठवड्यात झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींचा नव्या एनर्जी व्यावसायात समावेश करण्याची घोषणा केली होती. याशिवाय त्यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमची कमान मोठा मुलगा आकाश अंबानीकडे आणि रिलायन्स रिटेल व्यवसाय मुलगी ईशा अंबानीकडे सोपवला आहे.