अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून धावणार बसेस

पुणे – अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अखेर पीएमपी प्रशासनाने बसेसचे केले आहे. दि.7 एप्रिलपासून (बुधवार) शहरातील 20 मार्गांवर 41 बसेस धावणार आहेत. यामध्ये केवळ पालिका आणि शासकीय कर्मचारी, सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारपासून शहरातील पीएमपीची सेवा स्थगित केली. मात्र अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच्या बससेवेबाबतच्या निर्णयाचा चेंडू पालिकेच्या कोर्टात गेला होता. अखेरीस मंगळवारी अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनेनुसार ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

7 एप्रिलपासून (बुधवार) सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत 60 मिनिटांच्या वारंवारितेने 20 मार्गांवर 41 बसेसचे नियोजन केले आहे. या प्रवासी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र (आयकार्ड) पाहूनच बसेसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

या मार्गांवर बसेस धावणार
नांदेड सिटी ते डेक्कन, डीआयएटी (खडकवासला) ते पुणे स्टेशन, औंध ते डेक्कन, विमाननगर ते मनपा, विश्रांतवाडी ते मनपा, सांगवी ते पुणे स्टेशन, चिंचवड गाव ते पुणे स्टेशन, मनपा ते वाघोली, मनपा ते लोहगाव, मनपा ते कोंढवा हॉस्पिटल, मनपा ते वडगावशेरी, वारजे माळवाडी ते पुणे स्टेशन, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, वारजे माळवाडी ते मनपा, कात्रज-पुणे स्टेशन-कात्रज, कात्रज ते पुणे स्टेशन, भेकराई नगर ते मनपा, सासवड ते पुणे स्टेशन, तळेगाव ते मनपा, राजगुरूनगर ते मनपा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.