राजगुरूनगर -खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी लीगल सेलच्यावतीने भाजपचे आमदार गोपीचंद पडळर यांचा निषेध व्यक्त करीत खेड न्यायालयाच्या बाहेरील आवारात त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार मालती धोत्रे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी खेड तालुक्यचे सेलचे अध्यक्ष ऍड. अरुण मुळूक, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. बी. एम. सांडभोर, ऍड. सुखदेव पानसरे, खेड वकील बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. संजय पानमंद, उपाध्यक्ष ऍड. अतुल गोरडे, माजी अध्यक्ष ऍड. सुभाष कड, ऍड. माणिक पाटोळे, ऍड. संदीप गाडे, ऍड. बाळासाहेब निघोट, ऍड. अतिक सय्यद, ऍड. संदीप टेमगिरे, ऍड. सोमनाथ थोरवे, ऍड. रमेश गोकुळे, ऍड. सचिन पवळे, ऍड. दीपक पवळे, कालिदास दौंडकर, माउली करंडे, शिवाजी वाळूज, गौतम लोखंडे, पांडुरंग खुटाळ आदी उपस्थित होते.