यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या “बंटी और बबली 2’च्या युनिटने आबुधाबीमधील शुटिंग पूर्ण केले आहे. “बंटी और बबली 2’मध्ये सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी ही मंडळी आहेत.
आदित्य चोप्राची निर्मिती आणि वरुण शर्माच्या डायरेक्शनखाली तयार होणारा “बंटी और बबली 2′ याचवर्षी 26 जूनला रिलीज होणार आहे. या संदर्भात सर्व लीड ऍक्टरच्या फोटोबरोबर एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात सैफ आणि राणीबरोबर सिद्धांत आणि शर्वरी ही नवोदित जोडीही दिसते आहे. सिद्धांत यापूर्वी “गली बॉय’मध्येही दिसला होता.
या सिक्वेलमध्ये तो बंटी असेल, तर शर्वरी ही बबली असणार आहे. आबुधाबीमध्ये या टीमने केवळ 10 दिवस शुटिंग केले आहे. 2005 सालच्या “बंटी और बबली’च्या पहिल्या भागात राणी आणि अभिषेक लीड रोलमध्ये होते. पण आता त्या जोडीपैकी केवळ राणीला दुसऱ्या भागात घेतले गेले आहे. सैफ आणि राणी तब्बल 11 वर्षांनी एकत्र काम करत आहेत. पहिल्या भागातील बंटी और बबलीच्याच रोलमध्ये हे दोघे असतील. फक्त अभिषेक बच्चनच्या ऐवजी सैफ असणार आहे.