महापालिकेची 25 जूनला अंदाजपत्रक सभा

नगर – लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रक मंजूरीला मुहूर्त सापडला आहे. या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी येत्या 25 जून रोजी दुपारी 1 वाजता महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलविली आहे. त्यामुळे या सभेत या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर होवून विकास कामांना गती मिळले. दरम्यान, स्वीकृत सदस्य निवडीचा विषय विषयपत्रिकेत टाळण्यात आला आहे.
प्रशासनाने सादर केलेल्या 2019-2020 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर 7 मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिफारसी सुचविण्यात आल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने महापालिकेचे अंदाजपत्रक रखडले होते.

आयुक्तांच्या अधिकारात अत्यावश्‍यक खर्चाच्या मर्यादेत अंदाजपत्रकातील तरतुदींचा वापर केला जात आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होऊनही अंदाजपत्रकीय सभा घेतली जात नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी होती. अखेर महापौर वाकळे यांनी सभेची विषयपत्रिका काढला आहे. अंदाजपत्रक मंजूर न झाल्याने विकास कामे करतांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. सर्व विकास कामे त्यामुळे ठप्प पडली होती. आता ही कामे करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, मनपाच्या स्वीकृत सदस्यांची निवड सहा महिन्यांपासून रखडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.