Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सादर केला. निर्मला निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी महिला, शेतकरी आणि युवकांसाठी राबविण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आता आशा आणि अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे.
याशिवाय देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेत सहभागी करुन लखपती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या काळात 1 कोटी महिला या लखपती दीदी बनल्या असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, लखपती दीदींना बढती दिली जाईल. पगार दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींकडून स्वावलंबन आले आहे. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जाईल असेही त्यांनी यावेळी म्हटले.
#Budget2024 #ViksitBharatBudget
Ayushman Bharat
Health care cover under Ayushman Bharat to be extended to all ASHA workers, all Anganwadi workers and helpers
– Finance Minister
— PIB India (@PIB_India) February 1, 2024
केंद्र सरकार संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी बजेट भाषणात दिली. तसेच तिहेरी तलाक प्रथा बंद केल्याचे त्यांनी सांगितले. पीएम आवास योजनेतंर्गत 70 टक्के घरं महिलांना देण्याचे त्यांनी जाहीर केले. महिलांच्या विकासासाठीच्या इतर अनेक योजनांची उजळणी त्यांनी केली. दरम्यान, यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये मोठ्या घोषणा न करता, केवळ खर्चाची तरतूद करण्यात येते. त्यानुसार हे बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे.