वॉशिंग्टन – गेल्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये दोन महाभीषण अशा महायुद्धांमुळे जगाला मोठा हादरा बसला होता त्यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाची वेळ कधीही येऊ नये असे सर्वांना वाटत आहे पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिसरे महायुद्ध झाले तर काय होईल याबाबतचे चित्र रंगवण्यात आले असून ते निश्चितच भीषण आहे आणि अशा प्रकारचे युद्ध प्रत्यक्षात येऊ नये असे सर्वांना वाटत आहे.
दि सन या वृत्तपत्राने काही कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स तज्ञांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तिसऱ्या महायुद्धाबाबत चित्र रंगवण्यास सांगितले होते त्यामध्ये कोणत्या कारणाने हे तिसरे महायुद्ध येऊ शकते याचाही अभ्यास करण्यात आला होता.
त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की भौगोलिक आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळेच जगावर तिसऱ्या महायुद्धाची वेळ येऊ शकते जगातील अनेक देशांमध्ये होणारी लोकशाहीची घसरण किंवा वाढता राष्ट्रवाद आणि दहशतवादाचा वाढता प्रसार हीसुद्धा तिसरे महायुद्ध सुरू होण्याची कारणे असू शकतात अशा प्रकारे जर तिसरे महायुद्ध सुरू झाले तर त्यामध्ये अण्वस्त्रांचा वापर होण्याची सर्वात जास्त शक्यता असल्याने पहिल्याच तडाख्यात लाखो लोकांचा बळी जाऊ शकतो असे या अभ्यासात म्हटले आहे.
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला लष्करी संघर्ष असो किंवा गाझापट्टीमध्ये इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील सुरू असलेले युद्ध असो त्याच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला असून अशा छोट्या छोट्या संघर्षावर जर वेळीच तोडगा निघाला नाही तर तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटू शकते असा इशाराही या अभ्यासानंतर देण्यात आला आहे.
जगातील बहुतेक देश आता अण्वस्त्रधारी झाले असल्याने जर तिसरे महायुद्ध सुरू झाले तर अण्वस्त्रांचा वापर अपरिहार्य आहे आणि जर अशी अण्वस्त्रे वापरण्यात आली तर जगाचा विनाशही अटळ आहे असा इशाराही देण्यात आला आहे.