ध्वजबैठकीच्या पथकावर बांगलादेशी सैनिकांचा हल्ला

सीमा सुरक्षा दला एक जवान शहीद, अन्य एक हाताला गोळी लागून जखमी

नवी दिल्ली : ध्वज बैठक सुरू असतानाच बांगलादेशच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला. प. बंगालमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर ही बैठक सुरू होती. त्यावेळी बांगलादेशी सैनिकाने त्याच्याजवळील एके 47 रायफलमधून हा गोळीबार केला.

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काकमारिचार सीमा पोस्टवर हा प्रकार सकाळी नऊच्या सुमारास घडला. बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) जवान आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान पद्मा नदीच्या पात्रात भारतीय मच्छिमारांच्या प्रश्‍नावर चर्चा करत होते.

आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या तीन किमी रूंद असणाऱ्या पद्मा नदीत भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी मासेमारीसाठी परवानगी दिलेल्या तीन मच्छीमारांना बीजीबी सैनिकांनी ताब्यात घेतले. त्यातील दोन जणांना बीजीबीच्या सैनिकांनी सोडले. तिसऱ्याला आम्ही अटक केली आहे हे बीएसएफ वाल्यांना सांगा, असा निरोप त्यांनी पावला. त्यावेळी बीएसएफच्या जवानांचा कमांडर हा मुद्दा सोडवण्यासाठी एका बोटीतून सहा सहकाऱ्यांसह तेथे गेला. त्यावेळी बीजीबीच्या मोठ्या संख्येने तैनात असणाऱ्या सैनिकांनी तिसऱ्या मच्छीमाराला तर सोडले नाहीच, याउलट भारतीय जवानांना घेरण्याचा प्रयत्न केला.

वातावरण चिघळत असल्याचे पाहून बीएसएफच्या पथक तातत्काळ माघारी फिरले. त्यावेळी बीजीबीच्या जवानाने बोटीवर गोळीबार केला. त्यात सीमा सुरक्षा दलाचे विजयभानसिंग हे मुख्य हवालदार जागीच शहीद झाले. तर राजवीर यादव हे हाताला गोळी लागून जखमीं झाले. त्यांना भारतीय हद्दीत यशस्वीपणे आणण्यात आले. त्यांच्या हाताला गोळी लागून जखम झाली आहे.हा गोळीबार करणारा बीजीबीच्या सैनिकाची ओळख पटली असून त्याचे नाव सय्यद आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख व्ही. के. जोहरी यांनी बीजीबीचे प्रमुख मेजर जनरल शफिनुल इस्लाम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.