Pakistan drone : भारतीय सीमा सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील टिंडीवाला गावाजवळ पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत आलेला संशयित ड्रोन रोखला असल्याची माहिती समोर आली आहे. अंमली पदार्थ तस्करांचे गैरप्रकार थांबवण्यासाठी बीएसएफने तत्काळ कारवाई केली असल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली आहे. रविवारीही असाच ड्रोन पाडण्यात आला होता.
अंमली पदार्थांच्या तस्करांद्वारे वापरले जाणारे ड्रोन पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेपलीकडून येत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रविवारी बीएसएफने पंजाबमधील अमृतसरमधील भरोपाल गावात चीननिर्मित क्वाडकॉप्टर ड्रोन जप्त केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
BSF intercepted a suspected drone coming from Pakistan to Indian territory near the village – Tindi Wala, District – Ferozepur. As per the laid down drill, BSF troops immediately reacted to stop the misadventure by smugglers: Punjab Border Security Force
(Video Source: BSF) pic.twitter.com/Sd4GLevMzi
— ANI (@ANI) November 13, 2023
दरम्यान, देशातील गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेशासह ३३२३ किमी लांबीच्या भारत-पाकिस्तान सीमेवर रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. तर, सोमवारीही अंमली पदार्थांची तस्करी करणारा संशयित ड्रोन रोखण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
रविवारीच अशाच एका घटनेत सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने पंजाबच्या अमृतसरमधील नेस्ता गावात एक ड्रोन जप्त केला.