मराठमोळा ‘बाबा’ चित्रपट झळकला परदेशात

मुंबई- संजूबाबा आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाची निवड ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’ साठी झाली आहे. त्यामुळे आता हा मराठमोळा चित्रपट परदेशात झळकला आहे. ‘बाबा’ चित्रपटातून संजय दत्तने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे.

एका ऐकू-बोलू न शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. एका छोट्याशा गावात आपल्या छोट्याशा विश्वात हे कुटुंब खुश आहे. पण अशातच एक वादळ त्यांच्या आयुष्यात येते. एक उच्चभ्रू जोडपे त्यांच्या घरी येते आणि त्यांच्या मुलावर आपला हक्क सांगते. स्थानिक पोलीस हस्तक्षेप करतात आणि त्यांना मुलावरील हक्क कोर्टात शाबित करून आणायला सांगतात. त्यातून पुढे काय होते, बाबा सर्व संकटांवर मात करून आपल्या मुलाला त्या कायदेशीर लढाईत जिंकतो की त्याला हार मानावी लागते, हे अनुभवण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)