बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असून त्यांनी कर्नाटक विधानसभेत निरोपाचे भावनिक भाषण करताना आपण निवृत्तीच्या काळातही भाजपच्या बळकटीसाठी काम करीत राहू असे म्हटले आहे.
79 वर्षीय येडियुरप्पा यांनी म्हटले आहे की, आपण निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत असलो तरी आपण घरी बसून राहणार नाही. संपुर्ण राज्याचा दौरा करून भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण भाजपच्या बांधणीचे काम करीत राहु असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्याला भाजपने अन्यायकारक वागणूक दिली, आपला अवमान केला असे काही जण बोलतात. परंतु आपल्याला पक्षाने व पंतप्रधान मोदींनी खूप सन्मान दिला असे त्यांनी नमूद केले. लोकांच्या मनात हा जो भ्रम निर्माण झाला आहे तो लवकरच दूर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदींनी आपल्याला जो मानसन्मान आणि पद दिले त्याबद्दल मी त्यांचा कायमचा रूणी राहीन असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार – पंतप्रधान मोदी
दरम्यान, येडियुरप्पा यांच्या या निरोपाच्या भाषणाचे पंतप्रधान मोदींनीही कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या भाषणातून भाजपची नैतिकताच झळकली आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला त्यांचे हे भाषण खूप प्रेरणादायी वाटले असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यांनी आपल्या संदेशात येडियुरप्पांच्या भाषणाचा व्हिडीओही ट्विट केला आहे.