हॉलीवूडमधील जगद्विख्यात पॉप गायिका ब्रिटनी स्पिअर्स हिच्या जीवनावर आधारित “फ्रेमिंग ब्रिटनी स्पिअर्स’ नावाची एक डॉक्युमेंटरी लवकरच येत आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये ब्रिटनीच्या आयुष्यातील अनेक राज उघड केले आहेत. 2000 सालातील स्ट्रगल आणि अतिरूढीवादी पिता या विषयांवर ही या डॉक्यूमेंट्रीमध्ये स्पष्ट माहिती दिली आहे.
जेव्हा ही डॉक्युमेंटरी ब्रिटनीने स्वतः बघितली, तेव्हा तब्बल दोन आठवडे तिला अश्रू आवरणे कठीण झाले होते. स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष बघून ती रात्र-रात्र भर रडत असायची. स्वतः ब्रिटनी स्पिअर्सने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्तकेल्या आहेत.
याच पोस्टमध्ये ती एरोस्मिथच्या गाण्यावर डान्स करतानाही दिसते आहे. अपार मेहनत, संघर्ष आणि जीवनाशी तडजोड करत केलेली तिची यशापर्यंतची वाटचाल दर्शवणारा हा माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या समोरयेणार आहे.