नगर,दि.२३(प्रतिनिधी) – वरवंडीगांवात वेदीका श्रीकांत ढगे ही तीन वर्षाची बालिका बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. सकाळी आठ वाजता ही दूर्घटना घडली नेहमीप्रमाणे वेदीका सकाळी उठल्यावर अंगणात आली व खेळत बसली. घरातील सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. नजीकच्या गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने वेदीका वर हल्ला केला. घरातील सर्वांनी एकदमच आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या ने पलायन केले. जखमी वेदीकाला दवाखान्यात नेले पण तो पर्यंत सर्वकाही संपलेले होते. क्षणार्धात पापणी लवावी इतक्या वेगाने घटना घडली आणि वेदीका गतप्राण झाली.
वरवंडी चे माजी सरपंच रावसाहेब ढगे यांच्या या वस्तीवर ही दूर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकारी व वन विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे वनरक्षक सतीश जाधव गाडेकर अधि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. परीसरात बिबट्या चा वावर आढळलेला नव्हता.वनविभागाकडे पिंजरा लावण्यासाठी मागणी आलेली नव्हती.दूर्घटना घडल्यानंतर वन विभागाने दोन पिंजरे लावले आहेत. तालुक्यात पंचवीस ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र बिबट्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. किमान पंचवीस ठिकाणाहून पिंजरे व
लावण्यात यावेत अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे. मात्र वनविभागाकडे पिंजरे नाहीत. स्वंयसेवी संस्था, पतसंस्थेने या बाबतीत वनविभागास पिंजरे देवून सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाने केले आहे. यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.