बारावीच्या निकालात फलटण तालुक्‍याचे उज्ज्वल यश

मुधोजी हायस्कूलची साक्षी दोशी वाणिज्य शाखेत 93.67 गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम
फलटण –  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्‍यातील सर्व शाळांचे निकाल अत्यंत चांगले लागले आहेत. कु. साक्षी सुर्यकांत दोशी, निंबळक ही मुधोजी हायस्कूलची विद्यार्थीनी वाणिज्य शाखेत 93.67 टक्के गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूलमधुन इयत्ता 12 वी परीक्षेस 659 विद्यार्थी बसले त्यापैकी 649 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 98.48 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचे 184 विद्यार्थी परीक्षेस बसले ते सर्व उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यापैकी 47 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून तर 89 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 46 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 2 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. या विद्यालयाचा कला शाखेचा निकाल 94.52 टक्के लागला असून परीक्षेस बसलेल्या 73 पैकी 69 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शास्त्र शाखेचा निकाल 98.50 टक्के लागला असून परीक्षेस बसलेल्या 402 पैकी 396 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय, फलटणमधून 12 वी परिक्षेस 592 विद्यार्थी बसले त्यापैकी 468 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 79.05 टक्के लागला आहे. शास्त्र शाखेचा निकाल 90.34 टक्के, कला शाखेचा 66.56 टक्के आणि वाणिज्य शाखेचा 99.00 टक्के लगला आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार वल्लबभाई कनिष्ठ महाविद्यालय साखरवाडी येथून इयत्ता 12 वी परीक्षेस 98 विद्यार्थी बसले त्यापैकी 77 उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल 78.57 टक्के लागला आहे.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटणमधुन या परीक्षेस 735 विद्यार्थी बसले त्यापैकी 605 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 82.31 टक्के लागला आहे. या विद्यालयातुन वाणिज्य शाखेचे 147 पैकी 140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 95.23 टक्के, कला शाखेचे 293 पैकी 202 उत्तीर्ण झाले असून 68.94 टक्के आणि शास्त्र शाखेच्या 295 पैकी 263 उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल 89.15 टक्के लागला आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथून शास्त्र शाखेचे 754 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 730 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 96.81 टक्के लागला आहे. जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित छ. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय गिरवी येथून शास्त्र शाखेचे 47 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 82.97 टक्के लागला आहे. श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. वेणुताई चव्हाण कन्याशाळा व कनिष्ठ महाविद्यालय फलटणमधून कला शाखेचे 91 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 77 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 84.61 टक्के लागला आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित ज्योर्तिर्लींग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पवारवाडी (आसू) येथून या परीक्षेस कला शाखेचे 48 विद्यार्थी बसले त्यापैकी 43 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 89.58 टक्के लागला आहे.

जयभवानी एज्युकेशन सोसायटी संचलित फलटण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखेचे 35 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 25 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 78.12 टक्के लागला आहे. याच सोसायटीच्या सरस्वती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बिबी येथून कला शाखेचे 28 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 14 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 50 टक्के लागला आहे. या संस्थेचे हनुमान माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोखळी येथून कला शाखेचे 31 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 20 उत्तीर्ण झाले असून विद्यालाचा निकाल 64.51 टक्के लागला आहे.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय फलटण येथून कलाशाखेचे 35 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 25 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 71.42 टक्के लागला आहे. म. फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सासवड येथून कलाशाखेचे 39 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 33 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 84.61 टक्के लागला आहे. श्रीमंत बाबाराजे खर्डेकर कनिष्ठ महाविद्यालय हनुमंतवाडी येथून कलाशाखेचे 29 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 21 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 72.41 टक्के लागला आहे. हणमंतराव पवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेचे 32 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 19 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 59.37 टक्के लागला आहे.

मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बरड येथून कला शाखेचे 43 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 37 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 86.4 टक्के लागला आहे. श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाधववाडी येथून शास्त्र शाखेचे 76 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 75 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 98.68 टक्के लागला आहे. आंदरुड माध्यमिक विद्यालय येथून कला शाखेचे 20 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 15 उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 75 टक्के लागला आहे.

उत्तरेश्‍वर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विडणी येथून कला शाखेचे 22 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 16 उत्तीर्ण झाले असून निकाल 72.72 टक्के आणि वाणिज्य शाखेचे 23 पैकी 22 उत्तीर्ण झाले असून निकाल 95.65 टक्के लागला आहे. श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित वेणुताई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तरडगाव येथून कलाशाखेचे 30 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 19 उत्तीर्ण होवून निकाल 63.33 टक्के आणि वाणिज्य शाखेचे 12 पैकी 11 उत्तीर्ण होवून निकाल 91.66 टक्के लागला आहे.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजाळे येथून कला शाखेचे 29 पैकी 22 उत्तीर्ण होवून निकाल 75.86 टक्के आणि वाणिज्य शाखेचे 27 पैकी 23 उत्तीर्ण होवून निकाल 85.18 टक्के लागला आहे. भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित ऍम्बिशन इंग्शिल मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आदर्की बुद्रुक येथून वाणिज्य शाखेचे 19 पैकी 18 उत्तीर्ण होवून निकाल 94.73 टक्के आणि वाणिज्य शाखेचे 34 पैकी 34 उत्तीर्ण होवून निकाल 100 टक्के लागला आहे. जय भवानी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरकवाडी येथून कला शाखेचे 30 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 24 उत्तीर्ण होवून विद्यालयाचा निकाल 80 टक्के लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.