maratha reservation – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. २३ जानेवारीपासून सुरु होणारे हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत संपण्याच्या सूचना देखील राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचे संपूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार आहे.
दरम्यान २३ जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण आदेश मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २० जानेवारीला जिल्हाधिकार्यालय आणि महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहेत.
त्यानंतर वार्ड व तालुका या ठिकाणी हे अधिकारी २० आणि २१ तारखेला प्रशिक्षण देतील. हे सर्वेक्षण २३ जानेवारीला सुरू करून ३१ जानेवारीपर्यंत हे संपण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना आहेत.
पत्रात काय म्हटलंय?
महाराष्ट्र शासनाकडील १३ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. त्याअनुषंगाने राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.