हडपसर – आज स्पर्धेत महिला व्यवसाय करू शकतात. घरातील ज्येष्ठ मंडळी हेच आपला आधार आहे. पैसे बचतीचे नियोजन कुटूंबाला शिकवण्याचे काम कुटुंबातील महिला सदस्य करत असतात. महिला मुळातच सक्षम आहेत. एक स्त्री बाहेर पडते तेव्हा सर्व कुटुंब तिच्या पाठीमागे खंबीरपणे आधार देण्याचे काम करत असते.
त्यामुळे महिलांनी अर्धवेळ बाहेर पडून काम करावेच किंवा घर सांभाळून व्यवसाय करायलाच हवा, असे आवाहन ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सचिव सोनल चेतन तुपे यांनी केले. रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठान व रामदास तुकाराम तुपे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा हडपसर-महादेवनगर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सोनल तुपे बोलत होत्या.
यावेळी रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल तुपे, ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सचिव सोनल चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे ,प्रवचनकार छाया बाळासाहेब घुले, व्यवसाय मार्गदर्शक विनोद ताम्हाणे, हरिभाऊ काळे, डॉ.जयश्री तुपे, पौर्णिमा गायकवाड, मयुरी अमर तुपे, पल्लवी तुपे,तृप्ती पाटील, भारती तुपे, सविता मोरे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसरातील महिला बचत गटांना तसेच छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांना पतसंस्थेकडून माफक दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन ही करण्यात येणार असून त्याला आर्थिक सहाय्य करून प्रोत्साहन देण्याचा आमचा मानस आहे.
राहुल तुपे – संस्थापक अध्यक्ष- रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठान