शिरूर -करोना व्हायरसमुळे शिरूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात अफवांना ऊत सुटला आहे. फिरण्यासाठी गेलेले दोघे दुबईहून परतले आहेत. त्यांची तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असून यात कुठलेही लक्षणे आढळून आले नसल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कैलास बत्ते यांनी सांगितले.
तर शिक्रापूर परिसरात आढळलेला रुग्ण निगेटिव्ह निघाला असल्याने शिक्रापूर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तरीही त्याच्यावर, कुटुंबावर निरीक्षण ठेवले जाणार आहे.
शिरूरच्या दाम्पत्यावर आणखी काही दिवस लक्ष ठेवणार आहे. हे दाम्पत्य शिरूर येथील रहिवासी असून, दुबई येथे फिरण्यासाठी गेले होते. तीन मार्च रोजी दुबईवरून ते शिरूरला आले होते.
त्या दोघांना पुण्याला घेऊन गेले आहेत अशी चर्चा होती; परंतु शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली त्यांना कुठलीही लक्षणे दिसून आली नाहीत. तरीही या त्यांना आणखी सहा दिवस निरीक्षणाखाली ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.
याचबरोबर शिक्रापूर परिसरात एक संशयित आढळला असून, त्याच्यावरही नजर ठेवण्याचे काम शासकीय हॉस्पिटल कर्मचारी करीत आहे. शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थी यांना मास्क लावण्यात सांगितले आहे.