मुंबई – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या त्यांच्या घराच्या परिसरामध्ये काही बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या बॅनर्सवर जयंत पाटलांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आलेला आहे.
या बॅनरची चर्चा आता राजकीय वर्तुळातही होत आहे, दरम्यान काही दिवसापूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा,” असे विधान आमदार निलेश लंके यांनी केल्याने अजितदादांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले होते. अशात या बॅनरवर भावी मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील असे लिहिल्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. हे बॅनर त्यांच्या समर्थकाने लावले असून जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे, त्यामुळे या चर्चांना पु्न्हा हवा मिळाली आहे.
या बॅनरवर #Boss माझं दैवत भावी मुख्यमंत्री असे लिहिण्यात आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसामिनित्त मुंबईत त्यांच्या घरासमोर एका तालुका प्रतिनिधीने घराबाहेर बॅनर लावला आहे. नेपियन्सी रोडवर हे बॅनर सध्या झळकत आहेत. #Boss माझं दैवत भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे हे बॅनर आहेत. संतोष पवार असे बॅनर लावणाऱ्याचे नाव आहे. संतोष पवारांचे हे स्वप्न खरे ठरेल का ? हे आघाडीची सत्ता आल्यावरच समजेल.