मुंबई – काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता अजय देवगण यांना तंबाखूच्या जाहिरातीवरून खूप ट्रोल करण्यात आले होते. लोकांनी अक्षय कुमारला इतके ट्रोल केले होते की,त्याला सोशल मीडियावर माफी मागावी लागली आणि जाहिरातीमधूनही माघार घ्यावी लागली. हे प्रकरण अजून संपलेले नाही. आता ही या जाहिरातींवरून अनेक अभिनेत्यांना ट्विटरवर ट्रोल केले जात आहे.
अलीकडेच एका युजरने रस्त्याच्या कडेला एका मोठ्या होर्डिंगचा फोटो ट्विट केला आणि त्यात या तीन स्टार्सना टॅग करून त्यांना टार्गेट केले, पण या यूजरने चूक केली ती म्हणजे त्याने अजय देवगण ऐवजी सुनील शेट्टीला टॅग केले. त्यानंतर अभिनेता सुनील शेट्टी गप्प बसला नाही. आणि त्या व्यक्तीला सडेतोड उत्तर दिले, त्यानंतर या युजर्सने बॉलीवूडच्या ‘अण्णा’ची म्हणजेच सुनील शेट्टीची माफी मागितली.
काय आहे प्रकरण
एका ट्विटर युजरने होर्डिंगचा फोटो ट्विट केला, ज्यामध्ये गुटख्याच्या जाहिरातीत अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान यांचा फोटो छापलेला आहे. हे शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘हायवेवर इतक्या जाहिराती पाहिल्या की आता गुटखा खावासा वाटतो. त्याने ट्विटमध्ये सुनील शेट्टीला चुकून टॅग केले आणि पुढे लिहिले, ‘हॅलो #GutkaKingsofIndia शाहरुख, अक्षय आणि सुनील, तुमच्या मुलांना चुकीच्या मार्गाने देशाचे नेतृत्व केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मूर्खांनो, भारताला कर्करोगाच्या देशात नेऊ नका.’
या ट्विट ला सुनील शेट्टीने दिले रोखठोक उत्तर
हे ट्विट पाहिल्यानंतर सुनील शेट्टीने ट्विटरवरच त्या युजरला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी लिहिले, ‘भाऊ, तुझा चष्मा नंबर बदला.’ यासोबतच त्याने हात जोडणारा इमोजीही सेंड केल्या.
सुनील शेट्टीच्या उत्तरानंतर त्या युजरने त्याच्या ट्विटमध्ये अजय देवगणऐवजी त्याला टॅग केल्याबद्दल माफी मागितली आणि आपण त्याचा चाहता असल्याचेही सांगितले. त्याने लिहिले, ‘हॅलो सुनील शेट्टी. माफ करा तो mistag झाले आणि माझा हेतू तुम्हाला दुखवायचा नव्हता. यावर सुनील शेट्टीने हात जोडून एक इमोजी देखील सेंड केले आणि वापरकर्त्याला माफ केले.