Bollywood : बॉलिवूडनंतर ग्लोबल स्टार बनलेली प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास आनंदी आयुष्य जगत आहे. मुलगी मालती मेरीच्या जन्मानंतर हे जोडपे आणखी आनंदी दिसत आहे. प्रियांका तिच्या मुलीसाठी खूप प्रोटेक्टीव्ह दिसते. मालतीच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात कोणते बदल झाले हे या जोडप्याने नुकतेच सांगितले.
मुलाखतीत प्रियंका चोप्राने आई होण्याचा तिचा अनुभव शेअर केला. प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, ‘आई बनण्याच्या भावनेने तिला आणखीनच भावूक केले. मातृत्वामुळे माझ्या आत्मसन्मानावर किंवा आत्मविश्वासावर परिणाम झाला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण त्यामुळे मी अधिक सावध झाले. दररोज मला प्रश्न पडतो की मी काय चूक करणार आहे? मी असा गोंधळ कसा करू शकतो? माझ्यात आत्मविश्वास कसा कमी पडू शकतो ? मला वाटते की मला स्वतःला आठवण करून द्यावी लागेल की मी एक आत्मविश्वासी व्यक्ती आहे आणि मी हे करू शकतो.” असं सांगत तिने अनुभव शेअर केला आहे.
यापूर्वी, अमेरिकन शो एबीसी टॉक शोमध्ये प्रियांकाने सांगितले होते की, तिच्या मुलीने निकच्या आयुष्यात सकारात्मकता आणली आहे. यासोबतच प्रियांकाने तिची आई मधु चोप्रा आणि सासू डेनिस जोनास यांचेही कौतुक केले आहे. प्रियांकाने सांगितले होते की, ‘जेव्हा ती आणि निक कामात व्यस्त असतात तेव्हा तिची आणि निकची आई मालतीची काळजी घेते.’
प्रियांकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती शेवटची हेरगिरी अॅक्शन थ्रिलर ‘सिटाडेल’ आणि रोमँटिक कॉमेडी-ड्रामा ‘लव्ह अगेन’ मध्ये दिसली होती. ती सध्या अॅक्शन कॉमेडी ‘हेड्स ऑफ स्टेट्स’वर काम करत आहे, ज्यामध्ये ती इद्रिस एल्बा आणि जॉन सीनासोबत दिसणार आहे.