bollywood news । अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचे अफेअर एकेकाळी खूप चर्चेत होते. त्यांचे नाते आणि ब्रेकअप बर्याच काळापासून चर्चेत होते. ब्रेकअपनंतरही कतरिना आणि सलमानने एकत्र काम करणे सुरूच ठेवले आणि टायगर मालिकेसह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. अशात आता एका दिग्दर्शकाने खुलासा केला आहे की, ‘एक था टायगर’ दरम्यान सलमान आणि कतरिना यांच्यात नाराजी होती.’
अलीकडेच दिग्दर्शक कबीर खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या मॅशेबल इंडिया या नवीन पॉडकास्टमध्ये ‘एक था टायगर’मध्ये कतरिना आणि सलमानला एकत्र कास्ट करण्याबद्दल खुलासा केला. ब्रेकअपमुळे अभिनेत्री सलमान खानसोबत काम करण्यास कम्फर्टेबल नसल्याचेही सांगण्यात आले.
कबीर म्हणाला, “कतरिनाला आधीच साइन केले होते. चित्रपटात तिची झोयाची भूमिका साकारणार होती, आणि मग आम्ही सलमान खानकडे गेलो. हा तो टप्पा होता जिथे त्यांचे ब्रेकअप झाले होते आणि तो तितकासा खुश नव्हता. असे असूनही या दोघांनी चित्रपटात उत्तम काम केले असून हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याचेही तो म्हणाला.’
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि कतरिनाने 2005 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि त्यांचा रोमान्स चर्चेचा रंगल्या. 2010 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले आणि कतरिनाने रणबीर कपूरला डेट करायला सुरुवात केली. मात्र, कतरिनाचे रणबीर कपूरसोबतही ब्रेकअप झाले होते. यानंतर कतरिना आणि विकी कौशलची प्रेमकहाणी सुरू झाली. नंतर या जोडप्याने 2022 मध्ये लग्न केले.
सलमान खान आणि कतरिना कैफने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘मैने प्यार क्यूं किया’, ‘पार्टनर’, ‘हॅलो’, ‘युवराज’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’ आणि ‘टायगर 3’ मध्ये एकत्र काम केले आहे. चाहत्यांना सलमान आणि कतरिना कैफची जोडी खूप आवडते.