Bollywood News – ‘डॉन 3’ ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता वेगळ्याच पातळीवर आहे. फरहान अख्तरने रणवीर सिंगसोबतच्या ‘डॉन 3’ची प्रेक्षांकाच्या भेटीला येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. या चित्रपटात रणवीर मुख्य नायक असून, आता मुख्य नायिकेचा कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात सुपरहॉट प्रियांका चोप्रा ‘डॉन 3’चा भाग बनू शकते, असे बोलले जात आहे. प्रियांका ‘डॉन’ फ्रेंचायझीच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांचा भाग होती.
रिपोर्टनुसार, फरहान अख्तर ‘डॉन 3’ चित्रपटाच्या कास्टिंगवर गेल्या कित्येक दिवसांपासून लक्ष देत आहे. अशात ती लवकरच प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंगसोबत ‘डॉन 3’ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. अशी चर्चा सध्या रंगली आहे. प्रियांकाने नुकतीच फरहान अख्तरची भेट घेतली, यावेळी ‘डॉन 3’ बद्दल चर्चा करण्यात आली.
दरम्यानं, यावरून आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. प्रियांकाने ‘डॉन 3’ला होकार दिला आहे. फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. असे काही चाहत्यांचे मत आहे. या चित्रपटासाठी यापूर्वी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉनला अप्रोच करण्यात आले होते. मात्र कोणाचेही नाव निश्चित झाले नाही. ‘डॉन 3’चे शूटिंग कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र प्रियांका चोप्राचे नाव फायनल असल्याचे मानले जात आहे.
प्रियांकाने यापूर्वी रणवीरसोबत ‘गुंडे’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिल धडकने दो’मध्ये काम केले होते. तर, रणवीर सिंग सध्या ‘सिंघम अगेन’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, आणि प्रियांका चोप्रा तिच्या काही आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम पूर्ण करून ‘डॉन 3’ मध्ये सामील होऊ शकते. प्रियांका ‘सिटाडेल 2’ मध्येही दिसणार आहे.