बॉलिवूडच्या लोलोने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली आहे. करिश्मा पडद्यावर जरी झळकत नसली तरीही ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. मात्र आता करिश्मा लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. एकता कपूरच्या आगामी वेबसीरिज मध्ये करिश्मा झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. करिश्मा कपूरचे आजही तिचे लाखों चाहते आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, २००३ साली तिने संजय कपूर नामक एका व्यवसायिकासोबत लग्न केलं. मात्र तिचं लग्न दिर्घ काळ टिकलं नाही. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट घेताना तिने आपल्या पतीवर कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप केले होते.
View this post on Instagram
याबाबत तिने सांगितलं की,“ माझ्या कपड्यांवर राग व्यक्त करत आपल्या आईला मला थोबाडीत मारण्यास सांगितलं. तिनं देखील भर कार्यक्रमात मागेपुढे न पाहता माझ्यावर हात उगारला होता.”
View this post on Instagram
राजा हिंदुस्थानी हा करिश्माच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा ठरला. दिग्दर्शक डेविड धवनच्या राजा बाबू, अंदाज, कुली नं 1, जुड़वा, हिरो नं. 1, बीवी नं 1, हसीना मान जाएगी, दुल्हन हम ले जाएंगे, चल मेरे भाई यांसारख्या सिनेमामध्ये करिश्मा कपूरने भूमिका साकरल्या आहेत. करिश्मा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डेंजरर्स इश्क’ या चित्रपटात शेवटी झळकली होती. त्यानंतर फार कमी वेळा ती मोठ्या पडद्यावर आली.