मुंबई – अभिनेत्री नुसरत भरुचाची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे ती सेटवरचे कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर नुसरतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरच्या मते नुसरतला व्हर्टीगोचा अटॅक आला होता. त्यामुळे तिची तब्बेत बिघडली आहे.
नुसरत दिग्दर्शक लव रंजन यांच्या एका चित्रपटात काम करत आहे. मागिल 20 ते 25 दिवसांपासून या चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. शुटींद दरम्यान अभिनेत्रीची अचानक तब्बेत बिघडी व ती सेटवरच कोसळली.
नुसरतला शुटींगदरम्यान चक्कर आली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या तिची तब्बेत स्थिर आहे. मात्र तिला बेडरेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांच्या मते तिला व्हर्टीगोचा अटॅक आला होता.
अभिनेत्रीची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे चित्रपटाचे शुटींग काही दिवसांसाठी थांबविण्यात आले आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने सुद्धा या गोष्टींचा खुलासा केला आहे.