नवी दिल्ली : जेष्ठ गायक सुरेश वाडकरांनी मराठीसह भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी ,उर्दू भाषेत गाणी गायली आहेत. सुरेश वाडकर याचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५५ रोजी कोल्हापूर येथील चिखली गावी झाला.वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. 2007 साली त्यांना महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव केला आहे. तसेच मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
View this post on Instagram
आजही त्यांचा बाबत अशी चर्चा आहे की, त्यांना लग्नासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितचं स्थळ आल होत. त्या काळात माधुरीने नुकतंच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते. सुरेश वाडकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी मुलीचं स्थळ शोधायला सुरूवात केली होती. यातच त्यांचा एका नातेवाईकांनी माधुरीच्या कुटुंबियांनी माधुरीचं स्थळ सुरेश यांच्यासाठी पाठवलं.
View this post on Instagram
मात्र वाडकर कुटुंबाकडून या लग्नाला नकार कळवण्यात आला होता. कारण त्यांना त्यावेळी माधुरी शरिराने अतिशय लहान आणि दुबळी वाटत होती. आणि त्यानंतर हे लग्न कधीच झालं नाही. दरम्यान काही वर्षानंतर सुरेश यांनी शास्त्रिय गायिका पद्मा वाडकर यांच्याशी विवाह केला.
View this post on Instagram
सुरेश वाडकर यांनी अनेक सुपरहीट गाणी गेली आहे. और इस दिल में क्या रखा है, ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था, मेघा रे मेघा रे, सीने में जलन आखों में तुफाँ सा क्यु हैं, सुरमयी अखियों में, ऐ जिंदगी गले लगा ले, चप्पा चप्पा चरखा चले असे अनेक सुप्रसीध्द गाणी गायली आहेत.