पुणे: भाजप सेनेची युती झाल्यानंतर भाजपने सेनेला नवी मुंबई, पुणे, नागपूरमध्ये एकही जागा न सोडल्याने शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच नाराज झाले आहेत. पुण्यातील शिवसैनिक तर सेना भवनाला टाळे ठोकून मातोश्रीवर जाऊन बसले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे.
पुण्यात भाजपने शिवसेनेला एकही जागा न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. शिवाजीनगरची उमेदवारी सिद्धार्थ शिरोळेंना दिल्यामुळे या मतदार संघातून उत्सुक असलेले माजी पोलीस भानू प्रताप बर्गे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे.