पुणे: काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यात कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे सातारा लोकसभा निवडणूक ते लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील कसबा पेठ मधून पक्षाचे पलिकलेतील गटनेते अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवाजी नगरमधून दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दुसऱ्यात टप्प्यात एकम ५२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात निष्ठावंतांना संधी दिल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज यांनाही लातूर ग्रामीणमधून तिकीट दिले आहे.
INC COMMUNIQUE
The Central Election Committee has selected following candidates for the ensuing general elections to the Legislative Assembly of Maharashtra. https://t.co/qkhlFvRno6 pic.twitter.com/KuMZY0dF10
— INC Sandesh (@INCSandesh) October 1, 2019