वाघोली – महाविकास आघाडीच्या सरकार विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी वाघोली शहर च्या वतीने मंदिरे खुले करण्यासाठी वाघोलीच्या वाघेश्वर मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे वाघोली शहराध्यक्ष केतन जाधव यांनी दिली.
कोरोनाचा गैरफायदा घेत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांची सर्वप्रकारे मुस्कटदाबी करण्याचा चंग बांधलेला असून ऐन सणासुदीला मंदिरं, प्रार्थनास्थळ बंद करण्यात आली आहेत.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने वृत्तीचा तीव्र निषेध करण्यात आला असून भारतीय जनता पार्टी वाघोली शहर यांच्या वतीने वाघेश्वर मंदिर समोर शंखनाद आंदोलन व भजनी मंडळांच्या वतीने महाविकास आघाडीचा (ठाकरे सरकार)चा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, युवा मोर्चा हवेली अध्यक्ष अनिल भाऊ सातव पाटील, वारकरी, भाविक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.