नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीच्या एका गावात दोन बहिणींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर या दोन्ही बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी सहा आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे.
या घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मायावती यांनी उत्तरप्रदेश सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेता राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले, “लखीमपूरमध्ये भर दिवसा दोन अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून त्यांचा खून केला जातो, ही अतिशय संतापजनक घटना आहे. बलात्कार करणाऱ्यांना मुक्त करून त्यांचा सन्मान करणाऱ्यांकडून महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. आपल्याला आपल्या बहिणी-मुलींसाठी देशात एक सुरक्षित वातावरण तयार करायला हवे.”
लखीमपुर (उप्र) में दो बहनों की हत्या की घटना दिल दहलाने वाली है। परिजनों का कहना है कि उन लड़कियों का दिनदहाड़े अपहरण किया गया था।
रोज अखबारों व टीवी में झूठे विज्ञापन देने से कानून व्यवस्था अच्छी नहीं हो जाती।आखिर उप्र में महिलाओं के खिलाफ जघन्य अपराध क्यों बढ़ते जा रहे हैं? pic.twitter.com/A1K3xvfeUI
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 14, 2022
दरम्यान, प्रियंका गांधी म्हणाल्या, “लखीमपूरमध्ये घडलेली दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. त्या मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वृत्तपत्र आणि टीव्हीवर रोज खोट्या जाहिराती दिल्याने कायदा व सुव्यवस्था चांगली होत नाही. यूपीमध्ये महिलांवरील गंभीर गुन्हे का वाढत आहेत? या सरकारला कधी जाग येणार?”
1. लखीमपुर खीरी में माँ के सामने दो दलित बेटियों का अपहरण व दुष्कर्म के बाद उनके शव पेड़ से लटकाने की हृदय विदारक घटना सर्वत्र चर्चाओं में है, क्योंकि ऐसी दुःखद व शर्मनाक घटनाओं की जितनी भी निन्दा की जाए वह कम। यूपी में अपराधी बेखौफ हैं क्योंकि सरकार की प्राथमिकताएं गलत। 1/2
— Mayawati (@Mayawati) September 15, 2022
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती म्हणाल्या, “लखीमपूर खेरीमध्ये आईसमोरच दोन दलित बहिणींचे अपहरण आणि अत्याचार करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशा दुःखद आणि लज्जास्पद घटनांची जितकी निंदा करावी तितकी कमी आहे. या घटनेने यूपीमधील कायदा आणि सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारचे दावे उघड झाले आहेत.”
निघासन पुलिस थाना क्षेत्र में 2 दलित बहनों को अगवा करने के बाद उनकी हत्या और उसके बाद पुलिस पर पिता का ये आरोप बेहद गंभीर है कि बिना पंचनामा और सहमति के उनका पोस्टमार्टम किया गया।
लखीमपुर में किसानों के बाद अब दलितों की हत्या ‘हाथरस की बेटी’ हत्याकांड की जघन्य पुनरावृत्ति है। pic.twitter.com/gFmea4bAUc
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 14, 2022
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, ‘योगी सरकारमध्ये गुन्हेगार दररोज महिलांना त्रास देत आहेत. हे खूपच लज्जास्पद आहे. सरकारने या घटनेची योग्य चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करावी. लखीमपूरमधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या ही ‘हाथरस की बेटी’ हत्याकांडाची घृणास्पद पुनरावृत्ती आहे.’
लखीमपूर खेरी घटनेवर उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री जितिन प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘लखीमपूरची घटना अत्यंत वेदनादायी, दुःखद आहे. दोन निष्पाप मुलींसोबत जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस कडक कारवाई करत असून, या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याला सोडले जाणार नाही. अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील असून सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच मृत मुलींच्या कुटुंबासाठी पक्के घर तयार करून त्यांची शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात तपास करून, महिन्याभराच्या आत दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.