मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे आणि ब्रम्हास्त्र काही दिवसात 200 कोटींच्या क्लबमध्येही प्रवेश करू शकतो. एस एस राजामौली आणि आलिया भट आर आर आरनंतर पुन्हा एकत्र येणार असलायची चर्चा सुरु झाली आहे.
आलियाने एसएस राजामौली यांचा चित्रपट साइन केला आहे, ज्यामध्ये ती महेश बाबूसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेटही 800 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट मोठ्या कॅनव्हासवर तयार होणार आहे. आलिया भट्टच्या डिलिव्हरीनंतर चित्रपटाचे शूटिंग केले जाणार असल्याचेही बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच एसएस राजामौली महेश बाबूसोबत पॅन इंडिया चित्रपट बनवणार असल्याची बातमी आली होती. राजामौली यांनी अमेरिकेतील एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सांगितले होते की, त्यांचा पुढचा चित्रपट जगभरातील अॅक्शन अॅडव्हेंचर असेल. राजामौली आरआरआर आणि बाहुबली सारख्या चित्रपटांप्रमाणेच धमाका करण्यास सज्ज आहेत. आलिया सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र आलिया पुन्हा राजामौली सोबत दिसणार असल्यामुळे चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे. अधिकृत रित्या या चित्रपटाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.