P Chidambaram – आयकर विभागाची काँग्रेसला १३५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची नोटीस, हा देशातील सर्व राजकीय पक्षांना आणि जनतेलाही, भाजपने दिलेला इशारा आहे असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसला शुक्रवारी प्राप्तिकर विभागाकडून नव्या नोटिसा मिळाल्या आणि असून त्यात त्यांना आणखी १८२३ कोटी रुपये भरण्यास सांगितले गेले आहे. चिदंबरम यांनी म्हटले आहे की भाजपने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ८२५० कोटी रुपये मिळवले आहेत.
तरीही ते कॉंग्रेसला दंड ठोठावत आहेत याचा अर्थ भाजप सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करू पहात आहे हा यातला महत्वाचा इशारा आहे, तो सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांना यादेशात एक देश आणि केवळ एकच पक्ष हे तत्व अंमलात आणायचे आहे असा आरोपही त्यांनी केला.