Bank Holidays List April 2024: नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2024 पासून सुरू होईल. जर तुम्ही एप्रिल महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल आधी ही बातमी वाचा. वास्तविक, एप्रिलच्या 30 दिवसांपैकी एकूण 14 दिवस बँका बंद राहतील (Bank Holidays List).
या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. मात्र, पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका नियमानुसार सुरू राहतील. या 14 दिवसांमध्ये काही सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यानुसार असतील. देशभरात फक्त राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी बँका बंद राहतील.
महाराष्ट्रात किती दिवस बॅंका बंद ?
एप्रिल महिन्यात चार रविवार आणि दोन शनिवार असे 6 दिवस तर गुढीपाडवा (9 एप्रिल), रमजान इद (11 एप्रिल), श्रीराम नवमी (17 एप्रिल) असे 9 दिवस बॅंका बंद राहतील. सविस्तर यादी खाली पहा.
बँक सुट्ट्यांची यादी (एप्रिल 2024)
1 एप्रिल 2024 – आयझॉल, कोलकाता, गंगटोक, चंदीगड, शिमला आणि शिलाँग वगळता सर्व राज्यातील बॅंका वार्षिक खाते बंदीमुळे बंद राहतील.
5 एप्रिल 2024 – बाबू जगजीवन राम जयंती, जुमत-उल-विदा यामुळे जम्मू, श्रीनगर आणि तेलंगणामधील बॅंका बंद राहतील.
7 एप्रिल 2024 – रविवारमुळे सर्व राज्यांमध्ये बॅंक बंद.
9 एप्रिल 2024 – गुढी पाडवा, उगादी उत्सव, तेलुगु नववर्ष दिन, साजिबू नोंगमापनबा (चेराओबा), पहिली नवरात्र यामुळे इम्फाळ, जम्मू, चेन्नई, नागपूर, पणजी, बंगलोर, बेलापूर, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, श्रीनगर आणि तेलंगणा येथील बॅंका बंद राहतील.
10 एप्रिल 2024 – रमजान ईद (ईद-उल-फित्र) मुळे कोची आणि तिरुवनंतपुरममधील बॅंका बंद राहतली.
11 एप्रिल 2024 – रमजान-ईद (ईद-उल-फित्र) (1 शव्वाल) यामुळे कोची, गंगटोक, चंदीगड, तिरुवनंतपुरम आणि शिमला वगळता सर्व राज्यांमध्ये सुट्टी असले.
13 एप्रिल 2024 – दुसरा शनिवार, बोहाग बिहू, चेरोबा, बैसाखी, बिजू महोत्सवामुळे सर्व राज्यांतील बॅंका बंद राहतील.
14 एप्रिल 2024 – रविवारमुळे सर्व राज्यांमध्ये बॅंका बंद
15 एप्रिल 2024 – बोहाग बिहू, हिमाचल दिन यामुळे गुवाहाटी आणि शिमला येथील बॅंका बंद राहतील.
17 एप्रिल 2024 – श्री राम नवमी (चैत दशाई) यामुळे अहमदाबाद, कानपूर, गंगटोक, चंदीगड, जयपूर, डेहराडून, नागपूर, पाटणा, बेलापूर, भुवनेश्वर, भोपाळ, मुंबई, रांची, लखनौ, शिमला, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रातील बॅंका बंद राहतील.
20 एप्रिल 2024 – गरिया पूजा यामुळे आगरतळा येथील बॅंका बंद राहतील.
21 एप्रिल 2024 – रविवारमुळे सर्व राज्यांमध्ये बॅंका बंद राहतील.
27 एप्रिल 2024 – चौथा शनिवारनिमित्त सर्व राज्यांमध्ये बॅंका बंद.
28 एप्रिल 2024 – रविवारनिमित्त सर्व राज्यांमध्ये बॅंका बंद.
ग्राहक त्यांचे बँकेचे काम अशा प्रकारे करू शकतात –
या सुट्यांमध्ये ऑनलाइन बँकिंग सेवा दिवसभर सुरू राहील याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. यासोबतच एटीएमही सुरू राहणार आहेत. बँका कोणत्या दिवस बंद राहणार आहेत, याची माहिती सर्वसामान्यांना मिळणे महत्त्वाचे ठरते. या काळात विशेष दिवस आणि तारीख लक्षात ठेवावी जेणेकरून कोणताही ग्राहक आपले काम सोडून बँकेच्या शाखेत गेला तर त्याला सुट्टीच्या दिवशी निराशेचा सामना करावा लागू नये.