Anandraj Ambedkar Amravati loksabha 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर करत अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी घोषित केली. यानंतर महायुतीचे घटक असलेल्या बच्चू कडू यांनी देखील राणांविरोधात उमेदवार देण्यासाठी दंड थोपटले. अशात आता अमरावतीमधून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आपण स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हंटले आहे.
भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिल्यानंतर बच्चू कडू यांनी राणांविरोधात प्रहार उमेदवार देणार असलयाचे म्हंटले होते. शिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील अमरावतीमधून आपली उमेदवाराची घोषणा केली आहे. अशात आनंदराज आंबेडकर यांची अमरावती लोकसभेत एंट्री झाल्याने या मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. | Anandraj Ambedkar Amravati loksabha 2024
मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्याच म्हणत आपण स्वतः अमरावती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे. 2 एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. | Anandraj Ambedkar Amravati loksabha 2024
वंचितने जाहीर केली आहे उमेदवारी
वंचितने अमरावती लोकसभा मतदारसंघातून कु. प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र अमरावतीचा विकास रखडल्याने आपण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे आनंदराज यांनी म्हंटले आहे. | Anandraj Ambedkar Amravati loksabha 2024