गुगल जाहिरातीत भाजप पुढे

मुंबई – गुगलवर जाहिराती करण्याच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाने देशातील सर्वच राजकीय पक्षांना मागे टाकले आहे. तर गुगल जाहिरातींवर खर्च करणाऱ्य़ांमध्ये कॉंग्रेस सहाव्या स्थानी आहे. भारतीय पारदर्शक अहवालानुसार राजकीय पक्ष आणि त्यांच्या इतर घटकांनी फेब्रुवारी 2019 पर्यंत 3.76 कोटी रुपये खर्च केले आहे.

जाहिरातीच्या एकूण खर्चात एकट्या भाजपने 1.21 कोटी रुपये गुगल जाहिरातींवर खर्च केला आहे. यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. गुगलवरील जाहिरातीत भाजपचे प्रमाण 32 टक्के आहे. या यादीत प्रमुख विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस गुगलवरील जाहिरातीच्या बाबतीत सहाव्या स्थानी आहे.

या यादीत भाजपनंतर आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील वायएसआर कॉंग्रेस पक्ष आहे. वायएसआर कॉंग्रेसने 1.04 कोटी रुपये गुगल जाहिरातीवर खर्च केले आहेत. तर तेलगु देसम पक्षखर्चाच्या बाबतीत तिसऱ्य़ा स्थानी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.