आगामी लोकसभा निवडणुकीचे पहिले मतदान पार पडले

लोहितपूर – लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात ११ एप्रिलला पाहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मात्र अरुणाचल प्रदेश मध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे पहिले मतदान आज पार पडले. भारत-तिबेट सीमा सुरक्षादलाच्या अरुणाचल प्रदेशमधल्या चौकीवर पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘इ बॅलट्स’ पद्धतीने पहिले मतदान केले आहे.
अरुणाचल प्रदेश मधील लोहितपूरमध्ये हे मतदान केले गेले. इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम या यंत्रणेच्या माध्यमातून भारत-तिबेट सीमा सुरक्षादलाच्या जवानांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सरकारी अधिकारी, सैन्याचे जवान, अधिकारी, सशस्त्र पोलीस दल अशा सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे मतदान करण्याचा अधिकार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सगळे टप्पे झाल्यानंतर या मतपत्रिका मोजणीसाठी पाठवल्या जातात. या पद्धतीला ‘इ बॅलट्स’ असं म्हणतात. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.