बॅंका जेट एअरवेजचे भागभांडवल विकणार

नवी दिल्ली  -भांडवलाच्या अभावामुळे अडचणीत असलेल्या जेट एअरवेजचे भागभांडवल या कंपनीला कर्जपुरवठा केलेल्या बॅंका विकणार आहेत. यासाठीच्या बोली सहा एप्रिल पासून बोलल्या जाऊ शकणार आहेत. मात्र जर गुंतवणूकदारांनी याला प्रतिसाद दिला नाही तर इतर पर्याय खुले ठेवण्यात आले असल्याचे बॅंका तर्फे सांगण्यात आले. स्टेट बॅंक आणि इतर बॅंकांनी या कंपनीला नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

मात्र ही कंपनी अडचणीत आल्यानंतर या कंपनीची बरीच विमाने सध्या जमिनीवर आहेत. त्याचबरोबर कंपनीने कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही. कर्मचाऱ्यांनी एक एप्रिलपासून पगारासाठी आंदोलन करण्याचे
जाहीर केले होते.

मात्र नंतर 14 एप्रिलपर्यंत संपाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या सर्व घडामोडींचा परिणाम या कंपनीच्या शेअरच्या भावावर होत आहे. शुक्रवारीही या कंपनीच्या शेअरचे भाव दीड टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. गुरुवारी या कंपनीचा शेअर कोसळला होता. दरम्यान, या कंपनीला विमानाचा इंधन पुरवठा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने शुक्रवारपासून थांबविला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.