नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections 2022) रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक राजकिय ठराव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रमुख उपस्तिथी होती. या बैठकीत आगामी सात राज्यांच्या निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजकीय प्रस्तावात 18 विषय नमूद करण्यात आले आहेत. या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. 2004 ते 2014 दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ल्यात 2081 जणांचा मृत्यू झाला. तर 2014 ते 2021 पर्यंत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. केवळ 239 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
– राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली
(1) कोरोना लसीकरण कार्यक्रमाबाबत जगात भारताच्या भूमिकेवर चर्चा झाली.
(2) COP26 मध्ये पंतप्रधानांनी हवामान बदलाबाबत भारताच्या वचनबद्धतेवर केलेल्या चर्चेचे कौतुक करण्यात आले.
(3) अल्पावधीत 100 कोटी कोरोना लस नागरिकांना देण्याच्या यशावर चर्चा.
(4) कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधांबाबत केंद्र सरकारच्या कामाची चर्चा.
(5) 80 कोटी लोकांना मोफत अन्न, कोरोनामुळे मृतांची मुले दत्तक घेण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.
(6) नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकऱ्या निर्माण करण्यात भारतीय तरुणांची भूमिका आणि केंद्राची मदत यावर चर्चा.
(7) जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर विकासाला गती देण्याच्या मुद्द्यावर चर्चा.
(8) डिजिटल कार्यक्रम, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत योजना यांसारखे कार्यक्रम यावर चर्चा.
(9) जनऔषधी योजनेवर चर्चा.
(10) व्होकल फाॅर लोकल वर चर्चा.
(11) महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि प्रगतीसाठी कार्यक्रमांवर चर्चा.
(12) सामाजिक न्याय कार्यक्रमाची चर्चा.
(13) संरक्षण क्षेत्रातील बदलांवर चर्चा.
(14) राष्ट्रीय पाम ऑइल मिशनवर चर्चा.
(15) एमएसपी 5 पट वाढविण्यावर चर्चा, कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात एफपीओच्या भूमिकेवर चर्चा.
(16) सेवा संस्थेवर चर्चा, ज्यामध्ये 1 दशलक्ष स्वयंसेवकांनी भाग घेतला.
(17) पंतप्रधानांच्या सेवा क्षेत्रातील 20 वर्षांवर चर्चा.
(18) येत्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा.
(19) येत्या निवडणुकीत विजयाच्या ध्येयावर चर्चा.
(20) गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीवर चर्चा.
(21) पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारावर चर्चा – कायद्याद्वारे लोकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध.
ऑ
(22) विरोधी पक्षांच्या संधीसाधू वृत्तीचा आणि ट्विटरच्या माध्यमातून नकारात्मकता पसरवण्याच्या प्रयत्नाचा निषेध करण्यात आला.