भिवंडी – राज्यातील आणखी एका आमदाराला करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनंतर आता भाजपच्या आमदाराला करोनाची बाधा झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदार करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आमदारांचा आजच करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ताप आणि घसा खवखवण्याचा त्रास होता. लक्षणे दिसल्यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती.
यापूर्वी ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्रीधनंजय मुंडे यांना करोनाचा संसर्ग झाला होता. या तिघांनीही करोनावर मात केली आहे.
तीनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असला तरी नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.