देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीसाठी कसून तयारी करत मैदानात उतरले आहेत. येत्या काही दिवसात देशात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच महाराष्ट्रातील वातावरणही आता तापलंय. कोकणातही निवडणुकीचं वातावरण असून राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजपाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर नुकतीच कडाडून टीका केली होती.
कार्यकर्त्यांना भावनिक साद
भास्कर जाधव यांच्यावर भाजपने केलेली टीका त्यांना चांगलीच मनाला लागली असल्याचे दिसतंय. कारण भास्कर जाधव यांनी यावरून त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहीलं आहे. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. कार्यकर्त्यांना पत्र लिहिताना भास्कर जाधव यांनी, “तुम्ही सर्वांनी मला साथ दिली आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रुपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून राना-वनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळं मी यशाची अनेक शिखर पार करु शकलो. मित्रांनो, गेली 42 वर्ष सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय.”असे म्हटले.
यावर आता शिंदे गटाच्या आमदार मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदेंसोबत इतर आमदार गुवाहाटीला असताना भास्कर जाधवही तिकडे जाण्याच्या तयारीत होते, असा मोठा दावा योगेश कदम यांनी केला आहे.
योगेश योगेश कदम यांचा दावा
‘भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधताना योगेश कदम यांनी म्हटलं की, ‘स्वतःचं खरं कसं आहे हे रेटून न्यायचं आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करायचे या व्यतिरिक्त त्यांना काही येत नाही. शिवसेना-भाजप अशी मजबूत पकड जेव्हा बसत होती, तेव्हाच त्यांना घ्यायला नकार दिला होता. तेव्हाच ते यायला तयार होते, पण मला वाटत नाही आता कोणता पक्ष त्यांना घेईल.’
हेही वाचाच
भाजपकडून ऑफर आहे का ? माधुरीने दिल हे ‘उत्तर’ …